मंगळवार, 16 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

२६ नोव्हेंबरचा ‘भारत बंद’ यशस्वी करा : शेतकरी कामगार पक्षाचे आवाहन

Saturday, 21st November 2020 02:33:48 AM

गडचिरोली,ता.२१ : केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगारविरोधी कायद्यांना विरोध करण्याचा निर्धार देशभरातील शेतकरी आणि कामगार संघटनांनी घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या २६ नोव्हेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली असून, या भारतबंद मध्ये जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार आणि शासकीय - निमशासकीय सेवेतील कर्मचारी संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केले आहे. 

भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, भारतबंदच्या पार्श्वभूमीवर २६ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता इंदिरा गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी,कामगार आणि शासकीय - निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रसरकारने शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा घाट रचला असून तो कदापि यशस्वी होऊ देता कामा नये. यासाठी केंद्र सरकार विरोधात २६ नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या कायद्यातील तरतूदी अतिशय भयावह आहेत.सिलींग रद्द, शेतकरी असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. शेतकर्यांच्या पिकाला हमी भाव दिला जाणार नाही. महत्वाचा भाग असणारे कृषी उत्पन्न बाजार समित्याच रद्द करण्याचा घाटदेखील केंद्राने घातला आहे.

या प्रश्नांशिवाय कृत्रिम महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्यावी, कोरोनामुळे ओढवलेली भयंकर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी महिला बचत गटाचे कर्ज माफ करुन नव्याने आर्थिक मदत द्यावी, भरमसाठ वीज बिल पूर्णपणे माफ करावे, नोंदणीकृत बांधकाम कामगारांना लॉकडाऊन काळातील नुकसानीपोटी आर्थिक मदत द्यावी, शासकीय-निमशासकीय सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन आणि २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, इत्यादी मागण्याही या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. त्याकरिता २६ नोव्हेंबरच्या मोर्चात डाव्या पक्षांचे कार्यकर्ते आणि शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोंदणीकृत बांधकाम कामगार,बचत गटांच्या महिला, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपापल्या संघटनांचे बॅनर, झेंडे घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जिल्हा सहचिटणीस भाई संजय दुधबळे, महिला नेत्या जयश्री वेळदा, पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर,भाई नागेश तोर्रेम,भाई दामोधर रोहनकर, विजया मेश्राम,भाई सुनील कारेते यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9100R
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना