शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

शिवसेनेतर्फे अमिर्झा येथे भगवा पंधरवडा साजरा

Wednesday, 2nd December 2020 06:21:46 AM

गडचिरोली,ता.२: शिवसेनेतर्फे जिल्ह्यात ठिकठिकाणी भगवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा येथे नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांनी यावेळी नागरिकांना संबोधित केले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार जनकल्याणकारी कामे करीत आहे. मुख्यमंत्र्यानी आखलेल्या शेतीविषयक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी शिवसैनिकांनी पाठपुरावा करावा, असे आवाहन पोतदार यांनी यावेळी केले. 'गाव तेथे शाखा', 'घर तेथे शिवसैनिक' तथा सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करण्याच्या सूचनाही पोतदार यांनी यावेळी दिल्या.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, जिल्हा संघटक विलास कोडापे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सत्तेत असो किवा नसो; पण जनतेच्या हितासाठी, त्यांच्या सुखासाठी लढणारा शिवसेना पक्ष आहे. जनकल्याण करण्यासाठी लढण्याचे संस्कार बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिले आणि त्याचे तंतोतत पालन करून शिवसैनिक समाजकार्य करीत आहेत, असे कात्रटवार म्हणाले. जिल्हा संघटक विलास कोडाप म्हणाले, शिवसेना व शिवसैनिकाची आतापर्यंतची वाटचाल पुढील काळात येणाऱ्या संपूर्ण निवडणुकीच्या विजयाची नांदी असणार आहे. याप्रसंगी तालुकाप्रमुख गजानन नैताम, उप तालुकाप्रमुख यादव लोहबरे, संजय बोबाटे, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर बगमारे, गणेश दहलकर, निकेश लोहबरे, राहुल सोरते, राहुल नागापुरे,हिवराज रानडे, बालाजी वाकडे, दिनेश नारनवरे,आशिष वाकड़े, श्रीकांत रानडे, महेश बाबनवाड़े, सौरभ कुकडकर, दिनेश रानडे यांच्यासह शेकडो शिवसैनिक व गावकरी उपस्थित होते


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
15OKQ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना