शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

महिलेस जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ४ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 14th January 2021 06:34:20 AM

गडचिरोली,ता.१४: जुन्या वैमनस्यातून महिलेस जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमास जिल्हा व सत्र न्यायालयाने ४ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सुधाकर झिम्टूजी कुमरे, रा.बांधोना, ता.धानोरा असे दोषी इसमाचे नाव आहे.

बांधोना येथील जनाबाई धोंडू कुमोटी ही महिला २३ एप्रिल २०१९ रोजी सरखेडा येथे आपल्या भाचीच्या लग्नाकरिता गेली होती. लग्न आटोपून २७ एप्रिलला ती आपल्या गावी आली. यावेळी सुधाकर कुमरे याने २५ एप्रिलच्या रात्री आपल्या घरावर दगड फेकून मारल्याचे जनाबाई कुमोटीची सून मंदाबाई हिने जनाबाईला सांगितले. त्यानंतर जनाबाई, तिचा मुलगा व सून अंगणात झोपले असताना सुधाकर कुमरे याने सुरीने जनाबाईचे पोट, छाती, मनगट व बोटावर वार करुन तिला जखमी केले. जनाबाईच्या तक्रारीवरुन मालेवाडा पोलिसांनी आरोपी सुधाकर कुमरे याच्यावर गुन्हा दाखल केला. काही दिवसांनंतर त्याला अटक करण्यात आली. तपास पूर्ण होताच पोलिस उपनिरीक्षक रामदास जाधव यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज या खटल्याचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्षदारांचे बयाण नोंदवून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी सुधाकर कुमरे या भादंवि कलम ३०७ अन्वये चार वर्षांचा सश्रम कारावास आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक नारायण बच्चलवार यांनी जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
T05SA
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना