शनिवार, 10 एप्रिल 2021
लक्षवेधी :
  प्रेयसीला विहिरीत ढकलून तिची हत्या करणाऱ्या प्रियकरास जन्मठेपेची शिक्षा-गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             ७ एप्रिल कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्हयात कोरोनामुळे चार जणांचा मृत्यूं, १८५ नवे बाधित             नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र करण्याविषयीच्या तक्रारीवर ८ एप्रिलला सुनावणी             जाहिरात: गडचिरोली शहरात आरमोरी रोडवर प्रशस्त घर विकणे आहे. संपर्क साधा ९४०५१४३६७०           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २८ जानेवारीला

Thursday, 21st January 2021 01:56:37 PM

गडचिरोली,ता.२१: येथील गोंडवाना विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली २८ जानेवारीला आभासी पद्धतीने होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे व प्रभारी कुलसचिव डॉ.अनिल चिताडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

डॉ.कावळे आणि डॉ.चिताडे यांनी सांगितले की, कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, बंगलोर येथील ‘नॅक’चे संचालक डॉ.एस.सी.शर्मा हे दीक्षांत भाषण देणार आहेत. शिवाय कुलगुरु डॉ.श्रीनिवास वरखेडी व प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.

आभासी पद्धतीने उद्घाटन कार्यक्रम पार पडल्यानंतर कुलगुरु डॉ.श्रीनिवास वरखेडी व प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे यांच्या हस्ते २२ गुणवंत विद्यार्थ्यांना २८ सुवर्णपदके प्रदान करण्यात येतील. त्यात शेख सालेहा आरिफ हिला ३ सुवर्णपदके, सुशभ वानखेडे, सारिका यशवंत खोडे, प्रगती राजेंद्र मेहरे व रुचिता देवेंद्र गरगेलवार यांना प्रत्येकी दोन सुवर्णपदके, मोहित बिजेंद्र यादव यास १ सुवर्णपदक, तसेच ६९ विद्यार्थ्यांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात येणार असल्याचे डॉ.कावळे व डॉ.चिताडे यांनी सांगितले.

या समारंभात २०१९-२० या शैक्षणित सत्रातील हिवाळी २०१९ व उन्हाळी २०२० च्या परिक्षेतील अनुक्रमे १५९७ आणि १४९२१ अशा एकूण १६५१८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असून, फेसबूक लाईव्ह व यूट्यूबच्या माध्यमातून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ.कावळे व डॉ.चिताडे यांनी दिली. पत्रकार परिषदेला विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.सुरेश रेवतकर, डॉ.जी.डी.दुबे, वर्षा कोल्हे उपस्थित होते.   

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4B5DI
  © 2014 - 2021 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना