शनिवार, 10 एप्रिल 2021
लक्षवेधी :
  प्रेयसीला विहिरीत ढकलून तिची हत्या करणाऱ्या प्रियकरास जन्मठेपेची शिक्षा-गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             ७ एप्रिल कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्हयात कोरोनामुळे चार जणांचा मृत्यूं, १८५ नवे बाधित             नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र करण्याविषयीच्या तक्रारीवर ८ एप्रिलला सुनावणी             जाहिरात: गडचिरोली शहरात आरमोरी रोडवर प्रशस्त घर विकणे आहे. संपर्क साधा ९४०५१४३६७०           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

गडचिरोली जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंतच्या १०७२ शाळा सुरू

Wednesday, 27th January 2021 02:53:16 PM

गडचिरोली,ता.२७ : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या राज्य शासनाच्या आदेशानंतर आजपासून सुरु झाल्या. जिल्ह्यातील १०७२ शाळा कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत आजपासून सुरु झाल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात ३८१२२ (५१.६२ टक्के) विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.

गडचिरोली येथील प्लॅटिनम ज्युबिली शाळेत आज सकाळी १० वाजता इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे तापमान मोजल्यानंतर मास्क घालूनच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. अन्य शाळांमध्येही अशी तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील १०८८ शाळांमध्ये पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्याना शिकविणाऱ्या शिक्षकांची संख्या ३०४४ असून, त्यातील २८७० शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यातील १६ शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. काही शिक्षकांची तपासणी होण्यास आहे. एकूण ५८१७८ विद्यार्थी असून, आज पहिल्याच दिवशी ३८ हजार १२२ म्हणजेच ५१.६२ टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांनी दिली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6K54S
  © 2014 - 2021 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना