शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

Wednesday, 27th January 2021 07:54:43 AM

गडचिरोली,ता.२७: खवले मांजर या निशाचर प्राण्याची तस्करी करणाऱ्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चामोर्शी तालुक्यातील कुदरसी टोला येथून अटक केली आहे.

राजू घोती, इरफान सैफी आणि शकील सैफी अशी आरोपींची नावे आहेत. राजू घोती हा चामोर्शी तालुक्यातील कुदरसी टोला, तर इरफान सैफी हा उत्तरप्रदेशातील घुंगराला आणि शकील सैफी हा उत्तरप्रदेशातील सलाई येथील रहिवासी आहे.

इरफान सैफी आणि शकील सैफी हे कुदरसी टोला येथील राजू घोती याच्याकडे खवल्या मांजराची खरेदी करण्यासाठी गेले होते. खवल्या मांजर हा दुर्मिळ प्राणी असून, काही लोक गुप्तधन शोधण्यासाठी त्याचा वापर करतात. शिवाय औषधासाठीही त्याचा वापर केला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला मोठी मागणी असते. हे तिघे खवल्या मांजराची तस्करी करीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून कुदरसी टोला गावातून त्यांना अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
K9H09
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना