शनिवार, 10 एप्रिल 2021
लक्षवेधी :
  प्रेयसीला विहिरीत ढकलून तिची हत्या करणाऱ्या प्रियकरास जन्मठेपेची शिक्षा-गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             ७ एप्रिल कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्हयात कोरोनामुळे चार जणांचा मृत्यूं, १८५ नवे बाधित             नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र करण्याविषयीच्या तक्रारीवर ८ एप्रिलला सुनावणी             जाहिरात: गडचिरोली शहरात आरमोरी रोडवर प्रशस्त घर विकणे आहे. संपर्क साधा ९४०५१४३६७०           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

खासदार अशोक नेते यांची भाजपच्या अनुसूचित जमाती आघाडीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती

Wednesday, 3rd February 2021 01:17:46 PM

गडचिरोली,ता.३: गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांची भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती आघाडीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार समीर ओराव यांनी ही नियुक्ती केली आहे.

यापूर्वी खा.अशोक नेते हे भाजपच्या अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. या नियुक्तीबद्दल  चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार.डॉ. देवरावजी होळी, आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे, माजी राज्यमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर, माजी आमदार संजय पुराम, भाजपचे ज्येष्ठ नेते ओबीसी मोर्चाचे पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख बाबूराव कोहळे, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, जिल्हा महामंत्री ( संघटन)  रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, आदिवासी मोर्चाचे प्रदेश संघटन महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, जिपचे कृषी सभापती रमेश बारसागडे, समाजकल्याण सभापती रंजिता कोडाप, जिप सदस्या लताई पुंगाटी, अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेश सदस्य संदीप कोरेत, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिप सदस्य  नाना नाकाडे, तसेच सर्व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खा.अशोक नेते यांचे अभिनंदन केले आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
V46M4
  © 2014 - 2021 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना