गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

लियाकतभाईंना खुणावतेय राजकारण…..

Thursday, 11th February 2021 02:20:10 AM

गडचिरोली,ता.११: जिल्हा परिषदेत ३३ वर्षांची प्रदीर्घ सेवा दिल्यानंतर लियाकत अली हुसैन यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. शासकीय सेवेत राहून पडद्यामागचे राजकारण करणारे लियाकतभाई आता प्रत्यक्ष राजकारणात येणार काय, याविषयी सर्वसामान्य नागरिकांबरोबरच राजकीय मंडळींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

लियाकतभाई मूळचे सिरोंचाचे. सिरोंचा परिसर म्हटलं की तेलगू भाषा आलीच. केवळ प्रशासकीय कामासाठीच तिथले लोक गडचिरोलीला येतात; अन्यथा त्यांचा सर्व व्यवहार तेव्हाच्या आंध्रप्रदेश आणि आताच्या तेलंगणाशीच होत असतो. त्यामुळे तिकडच्या मराठी माणसाच्या नावापासून तर राहणीमानापर्यंत तेलगू स्टाईलचाच प्रभाव राहिला आहे. रामलू पोचालू दुर्गे, बिचन्ना लचन्ना कोडापे, भिमन्ना राजन्ना भांडेकर..…..अशी तेलगूमिक्स मराठी माणसांची नावं दिसली की समजून जायचं हा गृहस्थ सिरोंचाकडचा आहे म्हणून. कुणी मराठी बोललाच तर तो तेलगू ट्यूननेच बोलतो. पण, लियाकत भाई अस्खलीत तेलगू भाषेबरोबच चांगलं मराठी आणि हिंदीही बोलतात. ‘

लियाकत’ या शब्दाचा अर्थ होतो ‘योग्य’ आणि ‘शालीन’. त्यामुळे नावाप्रमाणचे ही शालिनता लियाकतभाईंच्या बोलण्या-वागण्यात आली. म्हणून ३३ वर्षांच्या सरकारी सेवेत मृदूभाषी व्यक्ती म्हणून लियाकतभाईंनी आपली छाप सोडली. कर्मचारी असतानाही गडचिरोली जिल्हा परिषदेच्या राजकारणावर त्यांनी आपली पकड निर्माण केली. एकेकाळी कुणाला कोणतं पद द्यायचं, कुणाला कोणतं काम द्यायचं याविषयीचे निर्णय लियाकतभाईंच्या ‘बारिक’ सल्या३षनेच होत होते, लियाकतभाईंचे घराणे कट्टर काँग्रेसी. पण, सर्वच पक्षांच्या स्थानिक नेत्यांशी त्यांचे संबंध मधूर राहिले आहेत.

शासकीय सेवा आणि पडद्यामागच्या राजकारणाबरोबरच लियाकतभाईंनी दानधर्म करण्यातही कुठलीच कसर सोडली नाही. सर्वच धर्मियांच्या उत्सवात त्यांची मदत ठरलेलीच असायची. नागभिड येथील प्रसिद्ध ‘उर्स’ च्या आयोजनातही भाईंचा मोठा रोल असतो. सिरोंचा होणाऱ्या प्रसिद्ध उर्समध्ये ते दरवर्षी आपल्याकडून १० हजार लोकांसाठी मोफत लंगरचे आयोजन करतात. एकूणच ऑलराउंडर असलेले लियाकतभाई आता सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे राजकारणात ते ताकदीने उतरतील, अशी चिन्हे दिसत आहेत. पुढच्या वर्षी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये भाईंचा रोल काय असेल, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
SG191
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना