शनिवार, 10 एप्रिल 2021
लक्षवेधी :
  प्रेयसीला विहिरीत ढकलून तिची हत्या करणाऱ्या प्रियकरास जन्मठेपेची शिक्षा-गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             ७ एप्रिल कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्हयात कोरोनामुळे चार जणांचा मृत्यूं, १८५ नवे बाधित             नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र करण्याविषयीच्या तक्रारीवर ८ एप्रिलला सुनावणी             जाहिरात: गडचिरोली शहरात आरमोरी रोडवर प्रशस्त घर विकणे आहे. संपर्क साधा ९४०५१४३६७०           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

एलसीबीने केली ११ गोवंश तस्करांना अटक; जनावरांसह १ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Monday, 1st March 2021 12:58:47 PM

गडचिरोली,ता.१: शेतकऱ्यांकडून अल्प किमतीत जनावरे खरेदी करुन ती कत्तलीसाठी नेणाऱ्या ११ जणांना गडचिरोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी १ कोटी १५ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शाहबाज हमीद खान रा. हैद्राबाद, अब्दूल अजीज अब्दूलरहू, रा.गडचांदूर, जि.चंद्रपूर, करीम खाँ नबी खॉ रा.कलगाव, जि.यवतमाळ, आसिफ मोहसीन कुरेशी रा.नागपूर, मिर्झा मुजाहिद मुबारक बेग, रा.जेन्नूर(तेलंगणा) हल्ली मुक्काम राजुरा, जि.चंद्रपूर, मिर्झा गफ्फार अन्वर बेग, रा. उतनूर तेलंगणा, शेख अस्लम शेख नवाज रा.किरामिरी तेलंगणा, लतिफ खान बाबू खान, रा.इलियासनगर तेलंगणा, राजू मदन पाल, रा.यशोधरानगर नागपूर, राजेश मडकाम, रा.नेवसा,जि.मंडला, मध्यप्रदेश व कमलेश उर्फ पिट्टू नत्थुलाल गुप्ता, रा.नागपूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आज पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरमोरी तालुक्यातील वैरागड-ठाणेगाव मार्गावर ही कारवाई केली. आरोपींकडून १७ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या १४१ गाई, म्हशी आणि रेडे, ९७ लाख रुपये किमतीची तीन वाहने आणि १ लाख १३ हजार रुपयांचे १० मोबाईल असा एकूण १ कोटी १५ लाख ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत सगणे यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4ZHZ2
  © 2014 - 2021 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना