शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

दोन गांजा तस्करांसह शेतमालक पोलिसांच्या जाळ्यात

Wednesday, 24th March 2021 06:13:25 AM

कुरखेडा ता.२४: तालुका मुख्यालयापासून अवघ्या एक-दीड किलोमीटर अंतरावरील वाकडी येथील शेतशिवारात गांजाची शेती करणाऱ्या एका शेतमालकासह तस्करी करणाऱ्या दोन युवकांना कुरखेडा पोलिसांनी मुद्देमालासह रंगेहाथ पकडून अटक केली. 

पुंडलिक मुंगसू कसारे (६५) रा.आजाद वॉर्ड,कुरखेडा असे शेतमालकाचे तर सौरव संतोष डहाळे (२०) आणि रितिक राधेश्याम मच्छिरके(२०) दोघेही रा.चिखली अशी आरोपींची नावे आहेत

वाकडी येथील एका शेतात गांजाची लागवड केली असून तेथून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकून शेतमालकासह दोन युवकांना रंगेहाथ पकडले. यावेळी आरोपीकडून ५२ किलो ९०० ग्रॅम वजनाचा २ लाख ६४ हजार ५०० रूपये किमतीचा ओला गांजा आणि २५ हजार रुपये किमतीची एक दुचाकी असा एकूण ८९ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एनडीपीएस १०९५ च्या कलम ८(क), २०(अ)(ब)(क) व २२(क) नुसार गुन्हा नोंद करुन अटक केली. पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांच्या नेतृत्वात हवालदार मानकर, बारसागडे, जांभुळकर,पोलिस शिपाई ललीत मेश्राम, मनोहर पुराम, पोलिस शिपाई अश्विनी रामटेके यांनी ही कारवाई केली.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
14841
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना