गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

ब्रम्हपुरी तालुक्यातील मजुरांवर काळाचा घाला, अपघातात चार जण ठार

Sunday, 28th March 2021 03:56:12 AM

गडचिरोली,ता.२८: जिल्ह्यात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये पाच जण ठार, तर १७ जण जखमी झाले. एक अपघात आष्टी-आलापल्ली मार्गावरील चंदनखेडी गावाजवळ घडला, तर दुसरा गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी-डोंगरगाव गावादरम्यान झाला. च्ंदनखेडीजवळच्या अपघातात नयना प्रभाकर निकुरे, देवाजी खोकले दोघेही रा. आवळगाव व साई रा.तेलंगणा अशी मृतकांची नावे आहेत. कुडेसावली येथील एका व्यक्तीचेही उपचारादरम्यान निधन झाल्याची माहिती आहे.

शुभम प्रभाकर निकुरे, पुष्पा खोकले, नैना निकुरे, निराशा जुमनाके, सत्यम जुमनाके, सर्व रा.आवळगाव तानाबाई आवारी, अर्चना आवारी हळदा, धनराज चुधरी, संतोष मेश्राम बोडधा, ज्योती मेश्राम, मधुकर चुधरी, प्रेमिला चुधरी सर्व रा.बोडधा, पुष्पा म्हस्के, कल्पना मारबते, कविता चुधरी सर्व रा.डोंगरगाव, ता.सावली, प्रशांत भोयर,रा.गेवरा खुर्द, ता.सावली, सुरेश चिंतापारटी,रा.चेन्नूर, तेलंगणा अशी जखमींची नावे आहेत.

आज दुपारी आष्टी-आलापल्ली मार्गावर चौडमपल्लीजवळच्या चंदनखेडी फाट्यावर शिवशाही बस व पिकअप या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाल्याने  चार  जण ठार झाले, तर १५ जण जखमी झाले. त्यातील १० जणांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींना चंद्रपूर व गडचिरोली येथे हलविण्यात आले असून,५ किरकोळ जखमींवर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नयना प्रभाकर निकुरे, देवाजी खोकले दोघेही रा. आवळगाव व साई अशी मृतकांची नावे आहेत. जखमी व्यक्ती हे ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव, हळदा व बोडधा येथील नागरिक आहेत. हे सर्वजण तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेले होते. तेथून पिकअप वाहनाने परत येत असताना भंडारा येथून गडचिरोलीमार्गे अहेरीकडे जाणाऱ्या शिवशाही बसची समोरासमोर धडक झाली. यात पिकअप वाहनाच्या चालकासह तीन जण ठार झाले..

दुसऱ्या एका घटनेत गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी-डोंगरगाव गावादरम्यान झालेल्या पिकअप व मोटारसायकल अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले. प्रणय सोमिलवार रा. कारवाफा असे या घटनेतील मृत युवकाचे नाव आहे. मोरेश्वर सोमिलवार व सुरेश सोमिलवार हे दोघे जखमी झाले. त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य्‍ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
AAUYU
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना