शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोली जिल्ह्यात ७३ कोरोनाबाधित, तर २२ रुग्ण कोरोनामुक्त

Wednesday, 31st March 2021 05:21:37 AM

गडचिरोली,ता.३१:  जिल्हयात आज अनेक महिन्यांनंतर प्रथमच ७३ नव्या कोरोनाबाधितांची नोद झाली, तर २२ रुग्ण आजारातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार ६२८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यातील १११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० हजार ५५ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. सध्या ४६२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६१ टक्के, तर मृत्यूदर १.०४ टक्के एवढा आहे.

नवीन ७३ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १९, अहेरी १९, आरमोरी  ७, भामरागड ११, देसाईगंज १५, चामोर्शी ३, धानोरा २, तर  एटापल्ली, कोरची व कुरखेडा तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

१ एप्रिलपासून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढणार

जिल्हयात  कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी नवीन आदेश काढून यापूर्वी केलेल्या प्रतिबंधित बाबींना १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच कोरोना रूग्णांच्या संपर्कातील इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये बाधित रुग्णांशी संबंधित कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे.  पहिल्या ७२ तासाच्या आत किमान ८० टक्के कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यासंदर्भात आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
K08M4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना