शनिवार, 10 एप्रिल 2021
लक्षवेधी :
  प्रेयसीला विहिरीत ढकलून तिची हत्या करणाऱ्या प्रियकरास जन्मठेपेची शिक्षा-गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             ७ एप्रिल कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्हयात कोरोनामुळे चार जणांचा मृत्यूं, १८५ नवे बाधित             नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र करण्याविषयीच्या तक्रारीवर ८ एप्रिलला सुनावणी             जाहिरात: गडचिरोली शहरात आरमोरी रोडवर प्रशस्त घर विकणे आहे. संपर्क साधा ९४०५१४३६७०           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

भर रस्त्यात क्लिनरने केला कंटेनरचालकाचा खून

Friday, 2nd April 2021 02:35:39 PM

गडचिरोली,२:  एकाच कंटेनरमधील क्लिनरने चालकाचा खून केल्याची घटना आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास धानोरा-सालेभट्टी गावादरम्यान घडली. अण्णाअर्जुन मारिया मिचेअल(४०) रा. कलवाड नानगुन्नेरी, तामीळनाडू असे मृत चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोनम्मा दासमी(४१) रा.उथ्थीरामूथ्थानपट्टी, तामीळनाडू यास अटक केली आहे.

सहा-सात दिवसांपूर्वी तामीळनाडूहून आलेला टीएन २८-एएल ४०८९ क्रमांकाचा कंटेनर धानोरामार्गे छत्तीसगड राज्याच्या दिशेने जात होता. धानोरापासून २ किलोमीटर पुढे गेल्यानंतर अचानक कंटेनरच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे चालक अणणाअर्जुनच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने कंटेनर रस्त्याच्या कडेला लावला होता. सहा-सात दिवसांपासून कंटेनर एकाच ठिकाणी उभा होता. दोघांकडील पैसे संपले होते. आजच कंटेनरच्या मालकाने चालकाच्या बँक खात्यात पैसे टाकले. ही बाब कळताच क्लिनर पोनम्मा याने चालकाला पैशाची मागणी केली. परंतु चालकाने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये भांडण झाले. यावेळी पोनम्मा याने सुरीने चालक अण्णाअर्जुनच्या पोटावर वार केला. यात तो जागीच गतप्राण झाला. पोलिस निरीक्षक विवेक अहिरे, उपनिरीक्षक रेड्डी हे घटनेचा तपास करीत आहेत.

 

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4SK4T
  © 2014 - 2021 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना