मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

नक्षल्यांनी केली माजी उपसरपंचाची हत्या

Saturday, 3rd April 2021 08:45:18 PM

गडचिरोली,ता.४: नक्षल्यांनी शनिवारी ३ एप्रिलच्या रात्री एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथील माजी उपसरपंच रामा तलांडी यांची गोळ्या घालून हत्या केली.

३७ वर्षीय रामा तलांडी हे शनिवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास गावातील एका लग्न समारंभात डीजे लावत असताना साध्या वेशभूषेत काही नक्षलवादी तेथे आले. त्यांनी तलांडी यांच्यावर दोन गोळ्या झाडून पळ काढला. यात तलांडी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

रामा तलांडी हे आदिवासी विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते होते. ते १० वर्षे बुर्गी ग्रामपंचायतीचे उपसरपंच होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
I508J
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना