शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोली जिल्हयात कोरोनामुळे चार जणांचा मृत्यूं, १८५ नवे बाधित

Wednesday, 7th April 2021 05:29:03 AM

गडचिरोली,ता.७:  जिल्हयात आज कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला. शिवाय १८५ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले, तर २८ रुग्णांनी आजारावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली.

आज गडचिरोली शहरातील गोकुळनगर येथील ६६ वर्षीय पुरुष, कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील ६० वर्षीय महिला, देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव(चोप) येथील ४५ वर्षीय महिला तसेच गडचिरोली शहरातील रामनगर येथील ५० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

आजच्या   नवीन १८५ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ६७, अहेरी १४, आरमोरी १४, भामरागड ११, चामोर्शी ८, धानोरा ९,  एटापल्ली ७, कोरची ४,  कुरखेडा ६, मुलचेरा ३, सिरोंचा  ५, तर  देसाईगंज तालुक्यातील २७ व इतर जिल्ह्यातील १० जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ११३८३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यातील १२२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०४०५ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. सध्या ८५६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.४१ टक्के, तर मृत्यूदर १.०७ टक्के झाला आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
T5NJS
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना