शनिवार, 10 एप्रिल 2021
लक्षवेधी :
  प्रेयसीला विहिरीत ढकलून तिची हत्या करणाऱ्या प्रियकरास जन्मठेपेची शिक्षा-गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             ७ एप्रिल कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्हयात कोरोनामुळे चार जणांचा मृत्यूं, १८५ नवे बाधित             नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र करण्याविषयीच्या तक्रारीवर ८ एप्रिलला सुनावणी             जाहिरात: गडचिरोली शहरात आरमोरी रोडवर प्रशस्त घर विकणे आहे. संपर्क साधा ९४०५१४३६७०           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकरास जन्मठेपेची शिक्षा

Wednesday, 7th April 2021 01:26:32 PM

गडचिरोली,ता.७: प्रेयसीला विहिरीत ढकलून तिची हत्या करणाऱ्या प्रियकरास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जयदेव निरंजन सरदार(२२) रा.कोपरअली, ता. मुलचेरा असे दोषी युवकाचे नाव आहे.

घटनेची हकीकत अशी की, ११ जून २०२० रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास आरोपी जयदेव सरदार हा त्याच्या मित्रासह मोटारसायकलने पुल्लीगुडम-चंदनवेली येथे गेला. दोघांनीही फोन करुन आपापल्या प्रेयसींना एका शेतात बोलावले. दोघीही तेथे गेल्या. त्यानंतर जयदेवचा मित्र व त्याची प्रेयसी एका झोपडीत थांबले, तर जयदेव हा आपल्या प्रेयसीला घेऊन जंगलात गेला. दोन ते अडीच तास ते तेथे थांबले. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे जयदेवने आपल्या प्रेयसीला मारहाण करीत मित्र व त्याची प्रेयसी थांबून असलेल्या ठिकाणी ओढत आणले. तेथे पुन्हा त्याने प्रेयसीला जबर मारहाण केली आणि एका विहिरीत ढकलून दिले. यात तिचा मृत्यू झाला. तिला वाचवायचा प्रयत्न केल्यास किंवा घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी जयदेवने त्याचा मित्र व प्रेयसीला दिली. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी मृत मुलीच्या वडिलांना काहीच सांगितले नाही.

दुसऱ्या दिवशी १२ जूनला सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास मृत मुलीचे वडील कोपरअली येथे जात असताना एका शेतातील विहिरीजवळ त्यांच्या मुलीच्या चपला व हातातील कडा दिसला. त्यानंतर वडिलांनी जयदेवचा मित्र व त्याच्या प्रेयसीस विचारणा केली असता त्यांनी हकीकत सांगितली. मृत मुलीच्या वडिलांनी काही नागरिकांना घेऊन विहिरीतून मृतदेह बाहेर काढला.

बोलेपल्ली पोलिस मदत केंद्रात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी जयदेव सरदार याच्यावर भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने फिर्यादी व साक्षदारांचे बयाण आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन तसेच आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळाल्याने आरोपी जयदेव निरंजन सरदार यास जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे, उपनिरीक्षक नारायण बच्चलवार यांनी जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
24WQA
  © 2014 - 2021 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना