शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

ओबीसी आरक्षण: भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात केले आक्रोश आंदोलन

Thursday, 3rd June 2021 06:43:11 AM

गडचिरोली,ता.३: ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी आज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांच्या नेतृत्वात गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात आक्रोश आंदोलन केले.

या आंदोलनात आ.कृष्णा गजबे, आ.डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगिता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रमेश बारसागडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिता भांडेकर, जिल्हा संपर्कप्रमुख सदानंद कुथे, नगरसेवक रमेश भुरसे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री भास्कर बुरे, भाजपचे तालुकाध्यक्ष रामरतन गोहणे, चामोर्शी तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, दुर्गा काटवे, विनोद देवोजवार, साईनाथ बुरांडे, विनोद गौरकार यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी करीत महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1550W
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना