गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

नाना पटोलेंनी गडचिरोलीत केले पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीविरोधात आंदोलन

Monday, 7th June 2021 06:10:11 AM

गडचिरोली,ता.७: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पेट्रोल व डिझेलच्या भाववाढीविरोधातील आंदोलनात सुरुवात गडचिरोली जिल्ह्यातून केली.

नाना पटोले यांनी सकाळी देसाईगंज येथील पेट्रोलपंपावर पेट्रोल व डिझेल भाववाढीविरोधात आंदोलन करुन केंद्र सरकारचा निषेध केला. त्यानंतर गडचिरोली येथेही श्री.पटोले यांनी आंदोलन केले. या आंदोलन राज्याचे आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, आ. अभिजित वंजारी, आ.अमर काळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पेट्रोलची मूळ किंमत ३० रुपये आहे. मात्र, मोदी सरकारने विविध प्रकारचे कर लावून जनतेची लूट केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. दरवाढ कमी झाली नाही तर सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पटोले यांनी यावेळी दिला.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
PA4M4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना