गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरतेय जिल्हा कोरोना नियंत्रण कक्ष

Friday, 18th June 2021 12:08:45 AM

गडचिरोली,ता.१८: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षाच्या सेवेचा लाभ हजारो रुग्णांनी घेतला आहे. त्यामुळे हा कक्ष रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.

कोरोना बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर व सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनोद म्हशाखेत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली. डॉ.सीमा आठमोडे, डॉ.हेमराज मसराम व डॉ.नारायण करेवार या तीन डॉक्टरांच्या नेतृत्वात या कक्षाचे कामकाज चालते. कोविड रुग्णांना दवाखान्यात भरती करणे, बेड उपलब्ध करुन देणे, भरती रुग्णांचे करंट स्टेटस रुग्णांच्या नातेवाईकांना सांगणे, रुग्ण भरती करताना व सुटी झाल्यानंतर रुग्णाला रुग्णवाहिका उपलब्ध करुन देणे इत्यादी कामे व्यवस्थितरित्या होत असल्याने अनेक रुग्णांना या कक्षाचा लाभ झाला.

विशेष म्हणजे दवाखान्यात भरती असलेल्या रुग्णांबरोबरच गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना जिल्हा कोरोना कक्षातील डॉक्टरांकडून मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जाते. शिवाय रुग्णांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करणे आणि वैद्यकीय सल्ला देणे ही कामेही केली जात असल्याने गडचिरोलीसह इतर जिल्ह्यातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा त्रास बऱ्याच अंशी कमी झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षातर्फे आतापर्यंत दवाखान्यात भरती असलेल्या ७१२२, तर गृह विलगीकरणातील ५११८ रुग्णांना मोबाईलद्वारे विचारपूस करुन वैद्यकीय सल्ला देण्यात आला. तसेच ४९३ जणांना बेड उपलब्ध करुन देण्यात आले. स्थापनेपासून आतापर्यंत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून ३०३ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांचे निराकरण जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षातर्फे करण्यात आले, अशी माहिती कक्षातर्फे देण्यात आली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UH74R
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना