शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोली शहरात अविवाहित इसमाचा खून

Thursday, 24th June 2021 12:49:10 AM

गडचिरोली,ता.२४: शहरातील गजबजलेल्या फुले वॉर्डात एका अविवाहित इसमाचा धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. दुर्योधन रायपुरे(४८) असे मृत इसमाचे नाव आहे.

अत्यंत गरीब असलेले दुर्योधन रायपुरे हे सामाजिक कार्यकर्ते होते. फुले वॉर्डातील आपल्या घरात ते एकटेच राहत होते. आज सकाळी ते मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळल्या आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा, पोलिस निरीक्षक प्रमोद बानबले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथकासही पाचारण करण्यात आले. यावेळी श्वानाने आरमोरी मार्गावरील शेतापर्यंतचा रस्ता दाखवला. त्यामुळे आरोपी याच मार्गाने पसार झाल्याचा अंदाज आहे. गडचिरोली पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

 

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
55DQE
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना