शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

कुरखेड्यात महिलेची गळा चिरून हत्या

Sunday, 4th July 2021 10:15:53 PM

 

 
कुरखेडा, ता. ५: येथील एका शेतात महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. शीलाबाई पुंडलिक कसारे(५५)रा.कुरखेडा असे मृत महिलेचे नाव आहे. 
शीलाबाई कसारे हिची कुरखेडा-वाकडी मार्गावर सती नदीच्या काठाजवळ पट्ट्याने मिळालेली शेती आहे. काल(ता.४) ती आपल्या दोन्ही मुलांसह शेतावर पेरणीकरिता गेली होती. दुपारी दोन्ही मुले घरी आली. मात्र शीलाबाई शेतातच होती. संध्याकाळ होऊनही आई घरी न आल्याने एका मुलाने शेतावर जाऊन बघितले. परंतु ती सापडली नाही. मध्यरात्री मुलीने संपूर्ण शेत पिंजून काढले, तेव्हा शीलाबाईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. शीलाबाईचा पती पुंडलिक कसारे हा दोन महिन्यांपासून एका गुन्ह्यात कारागृहात आहे. त्यामुळे तिची हत्या कोणी व कशासाठी केली, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. कुरखेडा पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
P941U
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना