गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

पोलिस हवालदाराचा खून करुन मारेकरी पसार

Monday, 5th July 2021 12:06:41 AM

गडचिरोली,ता.५: अज्ञात इसमाने एका पोलिस हवालदाराची त्याच्याच घरी गळा चिरुन हत्या केल्याची घटना काल(ता.४)रात्री अहेरीनजीकच्या नागेपल्ली येथे घडली. जगन्नाथ सिडाम(५३) असे मृत हवालदाराचे नाव असून, ते भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस मदत केंद्रात कार्यरत होते.

जगन्नाथ सिडाम हे काल रात्री नागेपल्ली येथील वॉर्ड क्रमांक दोनमधील आपल्या घरी झोपेत असताना एका इसमाने दार ठोठावला. त्यानंतर काही कळायच्या आत त्याने सिडाम यांचा गळा कापून पळ काढला. सिडाम यांना चंद्रपूरच्या दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ठाकूर, पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथकासही पाचारण करण्यात आले. जगन्नाथ सिडाम यांची हत्या कुणी व कशासाठी केली, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4995D
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना