गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

भाजपने केले महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याचे दहन

Tuesday, 6th July 2021 02:32:20 AM

गडचिरोली,ता.६:विधानसभाध्यक्षांनी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ आज गडचिरोलीत भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत आमदारांचे निलंबन तत्काळ मागे घेण्याची मागणी केली.

भाजप, भाजयुमो आणि भाजपच्या ओबीसी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी गडचिरोलीत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. विधानसभा सभागृहात ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चेत सहभागी  करावे, यासाठी  भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी तालिका अध्यक्षांना  विनंती  केली. मात्र, महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक  सभागृहात गोंधळ घातल्याचा व तालिका अध्यक्षांना शिवागीळ केल्याचा खोटा आरोप ठेवून सूडबुद्धीने भाजपच्या १२ आमदारांना निलबित केले. हे निलंबन म्हणजे लोकशाहीची क्रूर हत्या  असून, निलंबन तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस नगरसेवक प्रमोद पिपरे, नगराध्यक्ष योगिता पिपरे, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा सरचिटणीस गोविंद सारडा, प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते सुधाकर येनगंधलवार, भाजपचे शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, ओबीसी आघाडीचे नेते भास्कर बुरे, नगरसेवक रमेश भुरसे, अनिल पोहनकर, दलित आघाडीचे नेते जनार्धन साखरे, युवराज बोरकुटे, विनोद देवोजवार, श्याम वाढई यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी सहभागी झाले होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EM1G8
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना