शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

इंधन दरवाढीविरोधात महिला व युवक काँग्रेसची निदर्शने

Friday, 9th July 2021 06:31:05 AM

गडचिरोली,ता.९: पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीविरोधात आज महिला काँग्रेस व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने केली. काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करुन निषेध केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन इंधन दरवाढ तत्काळ कमी करण्याची मागणी केली. या आंदोलनात काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस डॉ . चंदा कोडवते, माजी नगरसेविका लता मुरकुटे, पुष्पा कुमरे, पौर्णिमा भडके, सुवर्णा उराडे, नीला निदेकर, निता वडेट्टीवार, स्मिता संतोषवार, वर्षा गुलदेवकर, आरती कंगाले यांच्यासह काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनिकांत मोटघरे,संजय चन्ने,तोफिक शेख,प्रतीक बारसिंगे,आशिष कामडी,मयूर गावतुरे,घनश्याम मुरवतकर,गौरव एनप्रेड्डीवार,विपुल येलेट्टीवार,कुणाल ताजने सहभागी झाले होते.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
KS2DM
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना