रविवार, 26 सप्टेंबर 2021
लक्षवेधी :
  २५ सप्टेंबर कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्ह्यात ३ जण बाधित, तर २ रुग्ण कोरोनामुक्त             कोरचीच्या तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान दिले भाड्याने, तहसीलदारांवरच भाड्याच्या घरात राहण्याची पाळी             जाहिरात: गडचिरोली शहरात आरमोरी रोडवर प्रशस्त घर विकणे आहे. संपर्क साधा ९४०५१४३६७०           

इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी काढली सायकल रॅली

Saturday, 10th July 2021 07:07:00 AM

गडचिरोली,ता.१०:पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरातील पेट्रोल पंपावर सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध केला.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी शृंगारपवार पेट्रोल पंप, बट्टूवार पेट्रोल पंप, रिलायन्स पेट्रोलपंप इत्यादी ठिकाणी जाऊन केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात काँग्रेस नेते पंकज गुड्डेवार, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अतुल मल्लेलवार, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, रोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष काशीनाथ भडके, जिल्हा महासचिव समशेरखा पठाण, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, अल्पसंख्याक आघाडीचे एजाज शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक प्रभाकर वासेकर, डी.डी. सोनटक्के, पं. स. सदस्य तथा तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बागेसर, वसंता राऊत, दिवाकर मिसार, ढिवरु मेश्राम, प्रतीक बारसिंगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
LKWW5
  © 2014 - 2021 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना