गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसने आरंभिले स्वाक्षरी अभियान

Sunday, 11th July 2021 03:14:30 AM

गडचिरोली,ता.११:देशभरात पेट्रोल व डिझेल, गॅस व अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. या दरवाढीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात आज गडचिरोली येथील पेट्रोल पंपावर स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.

मागील काही महिन्यांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर आदींचे दर वाढत आहेत. परिणामी वाहतुकीचे दर आणि जीवनावश्यक वस्तूंचीही भाववाढ होत आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना सर्वसामान्य नागरिकांची दमछाक होत आहे. याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत असल्याचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी सांगितले. यावेळी पेट्रोलपंपावर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. आंदोलनादरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरूद्ध घोषणाबाजी करत त्वरित दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी केली.

या आंदोलनात  काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते , जिल्हा युवक काँग्रेसचे निरीक्षक केतन रेवतकर,प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अतुल मल्लेलवार, काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनिकांत मोटघरे, महिला आघाडीच्या जिलहाध्यक्ष भावना वानखेडे, सोशल मीडिया सेलचे प्रदेश सचिव नंदू वाईलकर, नीतेश राठोड, संजय चन्ने,प्रतीक बारसिंगे,तोफिक शेख,घनश्याम मुरवतकर ,गौरव अलाम,हरबाजी मोरे,हेमंत भांडेकर,पंकज बारसिंगे,आशिष कामडी,विपूल येलेंट्टीवार,निखिल खोब्रागडे,माजी नगरसेविका लता मुरकुटे, माजी नगरसेविका पुष्पा कुमरे,पौर्णिमा भडके, सुवर्णा उराडे, नीला निंदेकर, नीता वडेट्टीवार,स्मिता संतोषवार,वर्षा गुलदेवकर,आरती कंगाले,फातिमा पठाण,कुणाल ताजने,योगेश नैताम,मयूर गावतुरे,खुशाल कुंभारे,रोहित निकुरे,तुषार सोनुले,निव्या कुंभारे, समीर ताजने,कमलेश खोब्रागडे,शिवम ओदेलवार सहभागी झाले होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
Y60SE
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना