रविवार, 26 सप्टेंबर 2021
लक्षवेधी :
  २५ सप्टेंबर कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्ह्यात ३ जण बाधित, तर २ रुग्ण कोरोनामुक्त             कोरचीच्या तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान दिले भाड्याने, तहसीलदारांवरच भाड्याच्या घरात राहण्याची पाळी             जाहिरात: गडचिरोली शहरात आरमोरी रोडवर प्रशस्त घर विकणे आहे. संपर्क साधा ९४०५१४३६७०           

इंधन दरवाढीविरोधात देसाईगंजमध्ये युवक काँग्रेसने काढली सायकल रॅली

Friday, 16th July 2021 07:03:25 AM

गडचिरोली,ता.१६:पेट्रोल,डिझेल आणि गँसच्या दरवाढीला विरोध दर्शविण्यासाठी आज युवक काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने देसाईगंज येथे अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सचिव विजयसिंग आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्त्वात सायकल रॅली काढून निदर्शने करण्यात आली.

युवक काँग्रेसच्या तालुका कार्यालयातून रॅलीची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शहरातील फवारा चौक, मुख्य बाजापेठेतून मार्गक्रमण करीत रॅली जय माताजी पेट्रोल पंपावर पोहचली. तेथे कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.

या रॅलीत युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव अजित सिंग,प्रदेश सचिव सर्वश्री केतन रेवतकर,विश्वजित कोवासे,रुचित दवे, युवक काँग्रेसचे आरमोरी विधानसभा अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, शहराध्यक्ष पिंकू बावणे,रजनिकांत मोटघरे,नंदू वाईलकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष परसराम टिकले,कमलेश बारस्कर,नरेन्द्र गजपुरे,विलास ढोरे,शहजाद शेख,आरिफ खानानी, राजू रासेकर, लतिफ रिजवी, नितीन राऊत, आरती लहरी,पंकज चहांदे, भूपेंद्र राजगिरे, नीतेश राठोड,संजय चन्ने,तोफिक शेख,गौरव एनपरेड्डीवार,विपुल येलेंट्टीवार,कुणाल ताजने,मयूर गावतुरे,संजय कुकडकर,नागजी दडमल,प्रवीण गायकवाड, राजू डोंगरवार,गोपाल दिघोरे,सुनील चिंचोडकर,राहुल सिडाम,आशिष कामडी,घनश्याम घुघरे,नरेश लिंगायत,समीर ताजणे, सौरभ जकनवार, नीलेश आंबादे यांच्यासह युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
62UYA
  © 2014 - 2021 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना