शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोली जिल्ह्यात दुग्ध प्रक्रिया उद्योग उभारा:खा.अशोक नेते

Wednesday, 21st July 2021 06:16:29 AM

गडचिरोली,ता.२१: उद्योगविरहीत गडचिरोली जिल्ह्याचा विकास करण्यासाठी येथे केंद्र सरकारने दुग्ध प्रक्रिया व अन्य उद्योग उभारावे, अशी मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय खाद्य प्रसंस्करण मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्याकडे केली आहे.

आज नवी दिल्ली येथे खा.अशोक नेते यांनी मंत्री प्रल्हाद पटेल यांची भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्याच्या उद्योगविषयक प्रश्नांबाबत चर्चा केली.

गडचिरोली जिल्ह्यात दुधाचे उत्पादन मोठया प्रमाणावर होते. त्यामुळे दुग्ध प्रक्रियेवर आधारित उद्योगांची निर्मिती केल्यास हजारो बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल आणि ते विकासाच्या प्रवाहात सामील होतील. त्यामुळे जिल्ह्यात उद्योग उभारण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी खासदार अशोक नेते यांनी मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांना केली.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
26747
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना