गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोली जिल्ह्यात ८ नवे बाधित, १३ रुग्ण कोरोनामुक्त

Thursday, 22nd July 2021 07:02:54 AM

गडचिरोली,ता.२२: जिल्ह्यात आज ८ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले, तर १३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

आजच्या ८ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ३,चामोर्शी २, तर मुलचेरा, सिरोंचा आणि कोरची तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, धानोरा, अहेरी, एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात आज एकही बाधित आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत ३० हजार ५४३ जण बाधित आढळून आले आहेत. त्यातील ७४३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, २९ हजार ७१० रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. सध्या ९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२७ टक्के, तर मृत्यूदर २.४३ टक्के झाला आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
R0UI0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना