मंगळवार, 16 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ६७ जणांना वनहक्क पट्टयांचे वितरण

Thursday, 22nd July 2021 07:05:39 AM

गडचिरोली,ता.२२: जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते आज धानोरा तालुक्यातील विविध गावांतील ६७ पात्र शेतकऱ्यांना वनहक्काचे पट्टे वाटप करण्यात आले.

धानोरा येथील तहसील कार्यालयात हा कार्यक्रम झाला. गोडलवाही, कामनगड, रेचे, सावरगाव, बोदीन, कुलभटी, कनगडी, पेंढरी, गायडोंगरी इत्यादी गावांतील नागरिकांना वनहक्के पट्टे वाटप करण्यात आले.

शिवाय केंद्र शासनाच्या कुटुंब लाभ अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत मुस्का, खामतळा, मेंढा, येरकड, जागंदा (बु). येथील ५ लाभार्थींना प्रत्येकी २० हजार रुपये याप्रमाणे धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रभारी उपविभागीय अधिकारी महेंद्र गणवीर, तहसीलदार सी.जी.पित्तुलवार उपस्थित होते.

ज्या नागरिकांचे वैयक्तिक वनहक्क पट्टे काही तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असतील, त्यांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंगला यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन वनिश्याम येरमे, तर आभार प्रदर्शन डी.एम.वाकुलकर यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ङी.आर.भगत, चंदू प्रधान, तुळशीराम तुमरेटी यांनी सहकार्य केले. यावेळी तहसील कार्यालयातील कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल व नागरिक उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
7T511
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना