बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

Thursday, 22nd July 2021 07:13:17 AM

गडचिरोली,ता.२२: येत्या २४ तासांत गडचिरोली जिल्हयात एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती इत्यादी नद्यांच्या पाण्याची पातळी सामान्य आहे. मात्र, तेलंगणा राज्यातील मेडिगड्डा प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील काही गावांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे. मेडिगड्डा प्रकल्पाचे ८५ पैकी ४१ दरवाजे सुरु करण्यात आले असून, त्यातून ७५९३ क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे.गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे बॅरेजच्या उर्ध्व भागात असलेल्या श्रीरामसागर प्रकल्प, कड्डम प्रकल्प, येलमपल्ली प्रकल्प,  पार्वती बॅरेज व सरस्वती बॅरेज मधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे रात्री ९ वाजतापर्यंत मेडिगड्डा बॅरेजचे पुन्हा २३ दरवाजे उघडण्यात येणार असून, त्यातून अंदाजे १६ हजार ९९० क्यूमेक्स पाण्‌याचा विसर्ग करण्यात येईल.

त्यामुळे नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, शिवाय विजेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी विनाकारण बाहेर पडू नये आणि पुलावरुन पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
42BB2
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना