गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

गडचिरोली जिल्ह्यात ५ नवे बाधित, १५ रुग्ण कोरोनामुक्त

Friday, 23rd July 2021 05:49:48 AM

गडचिरोली,ता.२३: जिल्हयात आज ५ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले, तर १५ रुग्ण आजारातून बरे झाले.

आजच्या  ५ बाधितांमध्ये चामोर्शी तालुक्यातील २ आणि मुलचेरा तालुक्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. गडचिरोली, अहेरी, आरमोरी, भामरागड, धानोरा, एटापल्ली, सिरोंचा, कोरची, कुरखेडा आणि देसाईगंज या दहा तालुक्यांमध्ये आज एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही.

जिल्हयात आतापर्यंत ३० हजार ५४८ जण बाधित आढळून आले आहेत. त्यातील ७४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर २९ हजार ७२५ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. सध्या ८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३१ टक्के, तर मृत्यूदर २.४३ टक्के झाला आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
D6H3T
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना