बुधवार, 26 जानेवारी 2022
लक्षवेधी :
  गडचिरोली जिल्ह्यातील ७ पोलिसांना पोलिस शौर्य पदक, तर दोन अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलिस पदक जाहीर             लसीकरणात गडचिरोली जिल्हयाची ३१ व्या क्रमांकावरून १६ व्या क्रमांकावर झेप-आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी केले अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतूक             गडचिरोलीत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा, नवमतदारांना जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचे वाटप             २५ जानेवारी कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्हयात ४३ जण बाधित, २०१ रुग्ण कोरोनामुक्त           

गडचिरोलीतील अट्टल सायकल चोर गजाआड, चोरी गेलेल्या २० सायकली जप्त

Tuesday, 27th July 2021 02:22:08 AM

गडचिरोली,ता.२७: नागरिकांच्या सायकली चोरुन विकणाऱ्या एका इसमाकडून पोलिसांनी २० सायकली जप्त केल्या असून, चोरट्यास कारागृहाची हवा दाखवली आहे. राजू जागेश्वर दोंडुकवार(४५)रा. गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे.

७ जुलै रोजी गडचिरोली येथील शीतल सुभाष बनकर या गोकुळनगर मार्गावरील भरडकर यांच्या इमारतीसमोर सायकल ठेवून योग वर्गाला गेल्या होत्या. वर्ग संपल्यानंतर बाहेर येताच सायकल चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर पोलिसांनी राजू दोंडुकवार यास ताब्यात घेतले. त्याने सायकल चोरी केल्याची कबुली दिली. अधिक तपासाअंती राजूने अनेक सायकली चोरुन चांदाळा येथील नागरिकांना विकल्याचे सांगितले. पोलिसांनी चांदाळा येथून ८० हजार रुपये किमतीच्या २० सायकली ताब्यात घेतल्या आहेत. राजू दोंडुकवार सध्या कारागृहाची हवा खात आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार गजानन सहारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. ज्या नागरिकांच्या सायकली चोरी झाल्या आहेत; त्यांनी सायकल त्यांच्या मालकीची असल्याबाबतचा पुरावा किंवा बिल घेऊन पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक प्रमोद बानबले यांनी केले आहे.

दारु पिण्यासाठी चोरायचा तो सायकली

राजू दोंडुकवारला दारुचे व्यसन आहे. त्यासाठी तो विशिष्ट ठिकाणी पाळत ठेवून सायकल चोरायचा. नंतर तो चांदाळा येथे जाऊन तेथील नागरिकांना कमी पैशात सायकल विकायचा आणि त्या पैशाने दारु ढोसायचा. याबाबतची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी चांदाळा येथून २० सायकली जप्त केल्या.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4832P
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना