/* */
सोमवार, 8 ऑगस्ट 2022
लक्षवेधी :
  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: कोरचीत १७ पैकी १३ प्रभारी अधिकारी करणार ध्वजारोहण             महागाईच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसची गडचिरोलीत रॅली             चामोर्शी पंचायत समितीतील आरोग्य सेवक एसीबीच्या जाळ्यात: कोतवाल पंजी प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी इसमाकडून स्वीकारली साडेतीन हजार रुपयांची लाच             सिरोंचा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी             निकृष्ट तांदूळ प्रकरण: अहवाल न दिल्याने राज्य शासनाने डीएसओला खडसावले             गडचिरोली येथे आरमोरी रोड आणि कारमेल हायस्कूलच्या मागे दोन प्रशस्त घरे विकावयाची आहेत: संपर्क: ९४०५१४३६७०           

मुख्यमंत्र्यांना अनोखी भेट: शिवसेना करणार कोविडमुळे पितृछत्र गमावलेल्या मुलांचे शिक्षण

Wednesday, 28th July 2021 12:44:02 AM

गडचिरोली,ता.२८: मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस(ता.२७) शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला. कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्या बेघर वस्तीतील एका कुटुंबाला ६ महिने पुरेल एवढे अन्नधान्य आणि पैसे दिले. सोबतच पित्याविना अनाथ झालेल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही कात्रटवार यांनी स्वीकारली.

गडचिरोली शहरातील शिवनगर या बेघर वस्तीत राजेंद्र कावळे हे पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्य करीत होते. मोलमजुरी करुन ते आपल्या कुटुंबाचा गाडा हाकायचे. परंतु यंदा १४ मे रोजी कोविडमुळे त्यांचा मृत्यू झाला. यामुळे कावळे कुटुंबावर मोठा आघात झाला. मोठा मुलगा रितीक हा पदवीच्या अंतिम  वर्षात,तर लहान रोशन हा बारावीत शिकत आहे. परंतु पित्याच्या मृत्यूमुळे शिक्षण कसे घ्यावे, याची चिंता त्यांना सतावू लागली. ही बाब कळताच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार हे आज शिवसैनिकांसह कावळे कुटुंबीयांच्या घरी पोहचले आणि त्यांना पुरेसे अन्नधान्य व रोख रक्कम प्रदान केली. शिवाय दोन्ही मुलांच्या शिक्षणाचीही जबाबदारी स्वीकारली.

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार,शिक्षक सेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर बगमारे,उपतालुका प्रमुख यादव लोहबरे, गणेश पिठाले, संजय बोबाटे, अनिल कोठारे, विलास दाजगाये, अमोल मेश्राम, स्वप्निल खांडरे, निकेश लोहबरे, नीलकंठ मेश्राम, कमलेश खोब्रागड़े, सुभाष ठाकरे, निखिल बारसागड़े, अजय मेश्राम, दिलीप मेश्राम, मोरेश्वर मेश्राम, राहुल मोटघरे,  आकाश तडलवार, तेजस वाकड़े, धनवंत  मेश्राम,साजन गुरनुले,  कार्तिक भोयर, तेजस सहारे, निखिल लेनगुरे, समीर खोबरागड़े,पंकज जुवारे, रूपेश  निखारे,  साहिल कत्रोजवार, गणेश खोबरागड़े, राकेश कापकर, गुरु सहारे, कविता कावळे, दुर्गा कांबळे, ज्योती पिपळशेन्डे, कल्पना गरमडे, सुरेखाचापले, सविता मदनकर, सुशीला सोनटक्के, सुधीर  बोरकर, भारत  कांबळे, भाऊराव नन्नावरे, लक्ष्मण सयाम, रोशन कावळे, शांताराम निमगड़े, गोपाल पानसे  यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.  

 

 

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
QPHVT
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना