रविवार, 26 सप्टेंबर 2021
लक्षवेधी :
  २५ सप्टेंबर कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्ह्यात ३ जण बाधित, तर २ रुग्ण कोरोनामुक्त             कोरचीच्या तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान दिले भाड्याने, तहसीलदारांवरच भाड्याच्या घरात राहण्याची पाळी             जाहिरात: गडचिरोली शहरात आरमोरी रोडवर प्रशस्त घर विकणे आहे. संपर्क साधा ९४०५१४३६७०           

ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड, १० जणांना अटक

Saturday, 31st July 2021 07:37:17 AM

गडचिरोली,ता.३१: मोबाईलवरुन ऑनलाईन जुगार अड्डा चालविणाऱ्या १० जणांना आष्टी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हे आष्टी, अहेरी व चंद्रपूर येथील आहेत. आरोपींकडून २१ लाख ३३ हजार १४० रुपये आणि जुगाराकरिता वापरण्यात येणारे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

ऑनलाईन जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळताच अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील छगन मठले, राजू धर्माडी, मनोज अडेटवार, द्राव्यराव चांदेकर, सुमित नगराळे, अहेरी परिसरातील सुरेंद्र शेळके, संदीप गुद्दपवार यांना चौकशीसाठी बोलावले. यावेळी हे सर्वजण बीईटीएक्स वन डॉट को आणि एनआयसीई डॉट ७७७७ डॉट नेट या बेकायदेशिर ऑनलाईन जुगार प्लॅटफार्मच्या माध्यमातून क्रिकेट, फूटबॉल व इतर बाबींसंबंधी बुकी म्हणून काम करीत असल्याचे निष्पन्न झाले. चंद्रपूर येथील राकेश कोंडवार, रजिक अब्दूल खान व महेश अल्लेवार हे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात बेकायदेशिररित्या ऑनलाईन सट्टा प्लॅटफार्मचे मुख्य वितरक असून, ते यूजर आयडी आणि पासवर्डद्वारे एजंट व क्लायंट तयार करतात, अशी माहिती ताब्यात घेतलेल्या आरोपींनी दिली. त्यानंतर चंद्रपूरच्या तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. या सर्व दहाही आरोपींविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक २३५/२०२१, भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ सहकलम जुगार अधिनियम तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ऑनलाईन जुगाराकरिता वापरण्यात येणारे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मनिष कल्वानिया, अपर पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर, शिपाई मनोज कुनघाडकर, विश्वनाथ उडाण, वडजू दहीफळे, श्रीकांत भांडे, नितीन पाल, सूरज करपते, उद्धव पवार, बेंगलाजी दुर्गे यांनी ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
A48H4
  © 2014 - 2021 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना