/* */
रविवार, 22 मे 2022
लक्षवेधी :
  वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश             कमलापूचे हत्ती जामनगरला नेण्याच्या विरोधात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन, तर भाजपने केला चक्काजाम             गडचिरोली येथे आरमोरी रोड आणि कारमेल हायस्कूलच्या मागे दोन प्रशस्त घरे विकावयाची आहेत: संपर्क: ९४०५१४३६७०           

कोरोना काळातील सेवा: खासदार राहुल गांधींची गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षांवर कौतुकाची थाप

Saturday, 7th August 2021 07:33:02 AM

गडचिरोली,ता.७: टाळेबंदीच्या काळात कोरोनाग्रस्त रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सेवा केल्याबद्दल काँग्रेस नेते खा.राहुल गांधी यांनी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे कौतुक करुन प्रशस्तिपत्र बहाल केले आहे.

५ ऑगस्टला युवक काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात दिल्लीत संसद घेराव आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हा युवक काँग्रेसची चमू जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात सहभागी झाली होती. यावेळी खासदार राहुल गांधी यांनी विशेषतः महाराष्ट्र राज्यातील निवडक कर्तृत्ववान जिल्हाध्यक्ष मंडळीसोबत चर्चा करुन त्यांचे कौतुक केले. त्यात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचाही समावेश होता.

टाळेबंदीमुळे कोरोना संसर्गाच्या काळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची आबाळ होत होती. हे लक्षात येताच महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिवाची पर्वा न करता जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना तब्बल ६० दिवस भोजनदान केले. शिवाय रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे ,रक्त उपलब्ध करणे, त्यांची अत्यावश्यक गरज पूर्ण करणे, प्रसंगी आर्थिक व इतर सर्व प्रकारची मदत करणे इत्यादी कामे त्यांनी केली. या कार्यासाठी समाजातील विविध घटकांनी सढळ हातांनी मदत केली.

ही संपूर्ण माहिती खासदार राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहचली होती. त्यामुळे दिल्लीतील ५ ऑगस्टच्या आंदोलनानंतर खा.राहुल गांधी यांनी महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे कौतुक केले. काँग्रेस म्हणजे सेवा. काँग्रेस म्हणजे कार्य. गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसने पक्षाचा आदर्श जोपासत नक्षलग्रस्त, दुर्गम, आदिवासीबहुल भागात कोरोना काळात जे कौतुकास्पद कार्य केले आहे; ते अभिमानास्पद आहे, अशा शब्दांत खासदार राहुल गांधी यांनी  महेंद्र ब्राम्हणवाडे त्यांच्या कार्याचे कौतुक करुन असे सेवाभावी कार्य पुढेही सुरु ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही., महाराष्ट्राचे प्रभारी विजय सिंग, प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत उपस्थित होते.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
606R4
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना