रविवार, 26 सप्टेंबर 2021
लक्षवेधी :
  २५ सप्टेंबर कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्ह्यात ३ जण बाधित, तर २ रुग्ण कोरोनामुक्त             कोरचीच्या तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान दिले भाड्याने, तहसीलदारांवरच भाड्याच्या घरात राहण्याची पाळी             जाहिरात: गडचिरोली शहरात आरमोरी रोडवर प्रशस्त घर विकणे आहे. संपर्क साधा ९४०५१४३६७०           

गडचिरोलीच्या २१ पोलिस अधिकारी, अंमलदारांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक जाहीर

Saturday, 14th August 2021 08:20:00 AM

गडचिरोली,ता.१४: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज शासनाने गडचिरोली पोलिस दलातील २१ पोलिस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती पोलिस शौर्यपदक प्राप्त झाले आहे. शिवाय एका अधिकाऱ्यास गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदक जाहीर झाले आहे.

राष्ट्रपती पोलिस शौर्यपदक प्राप्त अधिकाऱ्यांमध्ये गडचिरोलीचे तत्कालिन अतिरिक्त पोलिस अधीक्षक मंजुनाथ सिंगे(भापोसे),अपर पोलिस अधीक्षक हरी बालाजी(भापोसे), डीवायएसपी नवनाथ ढवळे, सहायक पोलिस निरीक्षक योगेश पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन काटकर, हवालदार लिंगनाथ पोरतेट, रोहिदास निकुरे, पोलिस शिपाई अरविंदकुमार मडावी, मोरेश्वर वेलादी, प्रवीण कुलसाम, सडवली शंकर आलाम, आशिष चव्हाण, बिच्चू सिडाम, शामसाय कोडापे, नीतेश वेलादी, पंकज हलामी, आदित्य मडावी, रामभाऊ हिचामी, मंगलशहा मडावी, ज्ञानेश्वर गावडे, शिवा गोरले यांचा समावेश आहे. सहायक पोलिस निरीक्षक मोतीराम मडावी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदक मिळाले आहे.

पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पुरस्कारप्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
K0D5J
  © 2014 - 2021 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना