मंगळवार, 16 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

स्वातंत्र्यदिनी २ हजारांची लाच स्वीकारणारी ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 15th August 2021 06:08:31 AM

गडचिरोली,ता.१५: अंगणवाडीत स्वयंपाक करणाऱ्या महिलेचे मानधन अदा करण्यासाठी तिच्याकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज स्वातंत्र्यदिनी गडचिरोली तालुक्यातील मरेगाव येथील ग्रामसेविका प्रीती लक्ष्मीकांत त्रिशुलवार(३५) हिला रंगेहाथ पकडले.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्या महिलेला ग्रामपंचायत कार्यालयाकडून तिच्या मानधनाचा धनादेश घ्यावयाचा होता. परंतु धनादेश देण्याचा मोबदला म्हणून ग्रामसेविका प्रीती त्रिशुलवार हिने तिला पंचांसमक्ष ३ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ती २ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाली. परंतु लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने स्वयंपाकी महिलेने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज मरेगाव ग्रामपंचायत कार्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी तक्रारकर्त्या महिलेकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेविका प्रीती त्रिशुलवार हिला ग्रामपंचायत कार्यालयासमोर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. तिच्यावर आरमोरी पोलिस ठाण्यात भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थू धोटे, शिपाई सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकवार, महेश कुकुडकार, किशोर ठाकूर, गणेश वासेकर, सोनल आत्राम, सोनी तावाडे, तुळशीराम नवघरे यांनी ही कारवाई केली.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9JS45
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना