/* */
सोमवार, 8 ऑगस्ट 2022
लक्षवेधी :
  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: कोरचीत १७ पैकी १३ प्रभारी अधिकारी करणार ध्वजारोहण             महागाईच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसची गडचिरोलीत रॅली             चामोर्शी पंचायत समितीतील आरोग्य सेवक एसीबीच्या जाळ्यात: कोतवाल पंजी प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी इसमाकडून स्वीकारली साडेतीन हजार रुपयांची लाच             सिरोंचा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी             निकृष्ट तांदूळ प्रकरण: अहवाल न दिल्याने राज्य शासनाने डीएसओला खडसावले             गडचिरोली येथे आरमोरी रोड आणि कारमेल हायस्कूलच्या मागे दोन प्रशस्त घरे विकावयाची आहेत: संपर्क: ९४०५१४३६७०           

नाना नाकाडे यांच्यासह भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर

Monday, 23rd August 2021 12:56:18 AM

गडचिरोली,ता.२३: ‘जे घर अत्यंत कष्टाने उभं केलं त्या घरात सन्मान मिळत नसेल, तर तेथे राहायचं कशाला’, असा सवाल करीत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना नाकाडे यांच्यासह अनेक नेत्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

नाना नाकाडे हे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती असून, विद्यमान सदस्य आणि भाजपचे गटनेते आहेत. भाजपचे ते जिल्हा उपाध्यक्षही आहेत. नाकाडे यांचे घराणे १९६७ पासून तत्कालिन जनसंघ आणि आताच्या भाजपशी जुळलेले आहेत. त्यांचे वडील डॉ.धनंजय नाकाडे आणि आई डॉ.इंदुताई नाकाडे यांच्या घरातूनच त्यावेळी तत्कालिन चांदा जिल्हा आणि पूर्व विदर्भातील जनसंघाची सूत्रे चालायची. परंतु आता अचानक त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच कुरखेडा तालुका भाजपचे माजी अध्यक्ष राम लांजेवार यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे ठरविले आहे. लांजेवार हे अनेक वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. आरमोरी शहरातील राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेला एक नेताही घरवापसी करणार आहे. शिवाय आरमोरी विधानसभा क्षेत्रातील १० ते १५ सरपंचदेखील कमळाचे देठ सोडणार आहेत. नाना नाकाडे व राम लांजेवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्याअनुषंगाने

२८ ऑगस्टला कुरखेडा येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार होते. या मेळाव्यात नाना नाकाडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. परंतु आता हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. यासंदर्भात नाना नाकाडे आणि राम लांजेवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय पक्का झाल्याचे ‘गडचिरोली वार्ता’ ला सांगितले. येणाऱ्या काळात आपण आपली ताकद दाखवून देऊ, असे नाना नाकाडे म्हणाले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5W4ED
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना