रविवार, 26 सप्टेंबर 2021
लक्षवेधी :
  २५ सप्टेंबर कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्ह्यात ३ जण बाधित, तर २ रुग्ण कोरोनामुक्त             कोरचीच्या तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान दिले भाड्याने, तहसीलदारांवरच भाड्याच्या घरात राहण्याची पाळी             जाहिरात: गडचिरोली शहरात आरमोरी रोडवर प्रशस्त घर विकणे आहे. संपर्क साधा ९४०५१४३६७०           

नरभक्षक वाघाच्या बंदोबस्तासाठी नागरिकांनी केले जेलभरो आंदोलन

Saturday, 4th September 2021 06:37:00 AM

गडचिरोली,ता.४: नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करुन, मृत व्यक्तींचे कुटुंबीय आणि जखमी व्यक्तींना भरीव आर्थिक मदत द्यावी, या मागण्‌यांसाठी नागरिकांनी आज जेलभरो आंदोलन केले.

मागील काही दिवसांपासून गडचिरोली तालुक्यात वाघाने धुमाकूळ घातला असून, महिनाभरात ३ नागरिकांना ठार केले, तर एक जण जखमी झाला. यामुळे नागरिकांना शेतीची कामे करणे कठीण झाले आहे. त्यामुळे धास्तावलेल्या १८ गावांतील नागरिकांनी १ सप्टेंबरपासून प्रादेशिक वनसंरक्षक कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन सुरु केले होते. परंतु वनाधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन न दिल्याने आज नागरिकांनी वनाधिकाऱ्यांचा निषेध करुन जेलभरो आंदोलन केले. या आंदोलनात आंबेशिवणी, गोगाव, अडपल्ली, चुरचुरा, भिकारमौशी व अन्य गावांतील नागरिक सहभागी झाले होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
OQK1N
  © 2014 - 2021 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना