शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, महिनाभरातील चौथी घटना

Monday, 6th September 2021 05:44:20 AM

गडचिरोली,ता.६: शेतावर गेलेल्या एका इसमास वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना आज दुपारी गडचिरोली तालुक्यातील धुंडेशिवणी गावानजीकच्या जंगलात घडली. नामदेव गेचू गुडी(६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

नामदेव गुडी हे आज सकाळी शेतावर गेले होते. दुपारी शेताजवळच्या जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला. हे जंगल वनविकास महामंडळाच्या अख्त्यारित असल्याची माहिती आहे. मागील महिनाभरात गडचिरोली तालुक्यातील चार जणांचा वाघाने बळी घेतला आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी १८ गावांतील नागरिकांनी ३ दिवस ठिय्या आंदोलन आणि ४ सप्टेंबरला जेलभरो आंदोलन केले. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी वाघाचा वावर असलेल्या परिसरातील जंगलात दोन पिंजरे लावले. मात्र, वाघ पिंजऱ्यात न अडकता त्याने पुन्हा एका शेतकऱ्याचा बळी घेतल्याने नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
S1K4U
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना