गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

कोरची तालुक्यात वीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार

Friday, 10th September 2021 07:59:52 AM

कोरची,ता.१०: तालुका मुख्यालयापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर मसेली गावानजीक असलेल्या सावली येथील जंगलात वीज कोसळून शंभराहून अधिक शेळ्या व मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही घटना काल(ता.९) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.

 कोरची तालुक्यात दरवर्षी राजस्थान व गुजरात येथून काही मेंढपाळ शेळ्या व मेंढ्या घेऊन येत असतात. यंदा हे मेंढपाळ दोन डेरे घालून वसलेले आहेत. त्यापैकी एक डेरा बेळगाव परिसरात, तर दुसरा डेरा सावली परिसरात आहे.  दोन्ही डेऱ्यांमध्ये ७-८ परिवारांचा समावेश आहे.

९ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास सावली परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू लागला. अशातच अचानक डेऱ्याजवळच वीज कोसळल्याने जवळपास ११० शेळ्या व मेंढ्या जागीच ठार झाल्या. यामुळे मेंढपाळांचे सुमारे ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कोरचीचे तहसीलदार छगनलाल भंडारी यांनी २ ते ३ किलोमीटर पायी चालून घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
L8YB6
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना