शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी रामदास टिपले

Tuesday, 14th September 2021 06:51:33 AM

गडचिरोली,ता.१४: येथील मत्स्यव्यवसाय विभागातील निवृत्त अधिकारी रामदास टिपले यांची काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस  अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष नितीन राऊत यांच्या मान्यतेनुसार, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांनी यांनी टिपले यांची नियुक्ती केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते सुकळी  रामदास टिपले यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी  गडचिरोली  जिल्हा  काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव  उसेंडी, हसनअली गिलानी प्रदेश महासचिव पंकज गुड्डेवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, देवाजी सोनटक्के, काशिनाथ भडके, लहुजी रामटेके, अनिल कोठारे, तेजस  मडावी, नंदू खानदेशकर, एजाज शेख पंकज खोबे  उपस्थित होते.

या नियुक्तीबद्दल रामदास टिपले यांनी  प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, अखिल भारतीय  अनुसूचित जाती समितीचे अध्यक्ष नितीन राऊत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष  विजय अंभोरे, जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव  उसेंडी व  सर्व काँग्रेस  पदाधिकारी  आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
05D5X
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना