शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

युवक काँग्रेसतर्फे पंतप्रधानांचा वाढदिवस ‘बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा

Friday, 17th September 2021 06:02:51 AM

गडचिरोली,ता.१७: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आज आरमोरी येथे युवक काँग्रेसने ‘बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ये-जा करणाऱ्यांना चहा पाजून केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध केला.

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात हे आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येताच दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु २ कोटी बेरोजगारांना रोजगार मिळालाच नाही;उलट कोरोना संसर्गाच्या काळात अनेक जणांचा रोजगार हिरावला गेला, अशी टीका महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली. कार्यकर्त्यांनी ये-जा करणाऱ्यांना चहा वाटून बेरोजगारी वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले. युवकांचे भविष्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने रोजगार निर्मिती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात युकाँचे विधानसभा अध्यक्ष तथा नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, युवक काँग्रेसचे महासचिव नीलेश अंबादे, तालुकाध्यक्ष सौरभ जक्कनवार, शहराध्यक्ष सूरज भोयर,साबीर शेख,सुरेंद्र सेलोटे, रुपेश जोंजाळकर, भुपेश वाकडे, मंगेश पाटील, मयूर सोमनकर, अमित सोमनकर, कमलेश दुधबळे, अतुल सोमनकर, अमोल धोडरे, स्वप्नील राऊत, नामदेव गोंदोडे, निकेश फुलबांधे, खेमचंद चाटाळे, सूरज सोमनकर, गोविंदा मेश्राम, प्रफुल कहालकर, अजय नारनवरे, सुमित आंबोरकर, जितेंद्र सोमनकर ,रोशन बाकमवर इत्यादी युवक काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
8Z1QQ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना