शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

सुरजागडमध्ये नक्षल्यांनी केली इसमाची हत्या

Sunday, 19th September 2021 01:08:05 AM

गडचिरोली,ता.१९: एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील सोमजी चैतू सडमेक(५०) या इसमाची नक्षल्यांनी रात्री गोळ्या घालून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

सोमजी सडमेक यास काल रात्री नक्षल्यांनी घरुन बोलावून जंगलात नेले होते. मात्र, आज सकाळी सुरजागडपासून काही अंतरावर असलेल्या मंदिराजवळच्या हातपंपाशेजारी सोमजीचा मृतदेह आढळून आला. नक्षल्यांनी घटनास्थळी पत्रके टाकली होती. ‘जल, जंगल व जमिनीला लुटणाऱ्यांना अशीच शिक्षा मिळेल, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दलाल नेत्यांना हाकलून लावा’, असा मजकूर पत्रकावर आहे.

सुरजागड येथील पहाडावर मागील तीन-चार महिन्यांपासून लोहखनिज उत्खननाचे काम सुरु आहे. यास नक्षल्यांचा विरोध असून, त्यांनी तशी पत्रकेही टाकली होती. मात्र, लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीने स्थानिकांना रोजगार देण्यासंदर्भात पावले उचलली होती. त्याअनुषंगाने सोमजी सडमेक याने कंपनीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती, म्हणून नक्षल्यांनी त्याची हत्या केली असावी, अशी चर्चा आहे. शिवाय घटनास्थळी आढळलेल्या पत्रकावरुनही हेच स्पष्ट होते.

दुसरीकडे, पोलिसांनी मात्र सोमजी सडमेक हा लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीला मजूर पुरवठा करीत असल्याची बाब फेटाळून लावली आहे. सोमजीने यापूर्वी झालेल्या नागरिकांच्या बैठकीत लोहखाणीस विरोध दर्शविला होता, असे हेडरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांनी ‘गडचिरोली वार्ता’ सांगितले.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
AX6OI
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना