गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

आकाशवाणीच्या ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक खुर्शिद शेख यांची मुलाखत

Friday, 24th September 2021 06:12:11 AM

गडचिरोली,ता.२४: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारा निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक खुर्शिद कुतुबुद्दीन शेख यांची ‘आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण  शिक्षण’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

शनिवारी २५ सप्टेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत  राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून ही मुलाखत प्रसारित होईल. तसेच न्यूज ऑन एआयआर या ॲपवरुनदेखील ही मुलाखत ऐकता येणार आहे. प्रसिद्ध निवेदक नरेंद्र  आरेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

खुर्शिद शेख हे सिरोंचा तालुक्यातील असरअली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक असून, त्यांना अलीकडेच राष्ट्रपती शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्यानंतरच्या भावना, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय जीवनाशी जोडण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम,गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह, आनंददायी शिक्षण,कोरोना कालावधीत राबविण्यात येणारे उपक्रम,शिक्षणामध्ये विद्‌यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विद्यार्थ्यांचा या उपक्रमांना लाभत असलेला प्रतिसाद, विद्यार्थी आणि शिक्षकांना केलेले आवाहन आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. शेख यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.         


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
GAI4A
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना