गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या १३ जणांना अटक, ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Thursday, 30th September 2021 08:36:20 AM

गडचिरोली,ता.३०: जिल्ह्यातील दुर्गम भागातील गोवंश कत्तलीसाठी नेणाऱ्या १३ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून गोवंश आणि वाहने असा ७६ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शेख खदिर शेख चाँद, शेख नबी शेख गणी, शेख इजाज शेख आझम(सर्व रा.तेलंगणा), ख्वाजा मयनुद्दिन सय्यद, रा.उदगिर, जि.लातूर, जिलानी मेहबूब शेख, रा. मरकागोंदी, ता.जिवती, जि.चंद्रपूर, अजहर सय्यद,रा.भाईपटार, ता.जिवती, जि.चंद्रपूर, युनूस सय्यद, रा.गोयगाव, आसिफाबाद, अनिल सुर्वे रा.गणेशपूर, जि.वाशिम, शेख इक्बाल शेख नुरु रा.मुर्तिजापूर,जि.अकोला, मोहम्मद सुफियान नसीर, रा.खडकपुरा, ता.मुर्तिजापूर,जि.अकोला, अब्दूल गफ्फार अब्दूल गुलाब,रा.मुर्तिजापूर, नासीर वाहाब शेख, रा.पठाणपुरा, ता.मुर्तिजापूर,जि.अकोला व गणेश पप्लवाड रा.गडचांदूर, ता.कोरपना, जि.चंद्रपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे पावणेचार वाजताच्या सुमारास पोलिसांनी गडचिरोलीनजीकच्या मुरखळा गावाजवळ सापळा रचला होता. यावेळी ४ मालवाहू ट्रक व ३ बोलेरो वाहने चंद्रपूरच्या दिशेने भरधाव येताना दिसली. या वाहनांना थांबवून तपासणी केली असता त्यात ११९ गाई, म्हशी व रेड्यांना निर्दयतेने कोंबण्यात आल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या जनावरांना हळदा येथील गोशाळेत नेऊन मोकळे गेले. त्यानंतर चार ट्रक आणि ३ बोलेरो वाहने जप्त करण्यात आली. १३ लाख ८६ हजार रुपये किंमतीची जनावरे आणि ६३ लाख ५ हजार रुपये किंमतीची वाहने आणि १० मोबाईल असा एकूण ७६ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

पोलिस अधीक्ष्क अंकित गोयल व अपर पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गौरव गावंडे, भाऊराव बोरकर, सत्यम लोहंबरे, नीळकंठ पेंदाम, संजय चक्कावार, दिनेश कुथे, शुक्राचारी गवई, सुनील पुट्टावार, मंगेश राऊत, नुतेश धुर्वे, माणिक निसार, शेषराव नैताम आदींनी ही कारवाई केली.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
K4OM5
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना