सोमवार, 25 ऑक्टोबर 2021
लक्षवेधी :
  गरिबांचा प्रवास महागला:एसटीची १७.१७ टक्के भाडेवाढ, २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू             ओडिशातून भटकत आलेल्या रानटी हत्तींचा कोरची, धानोरा तालुक्यात धुमाकूळ, हत्तीच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी, पिकांचीही केली नासधूस             जहाल नक्षलवादी मंगरु मडावी यास पेरमिली परिसरातून अटक             ओबीसींच्या अर्धा टक्का आरक्षणालादेखील हात लावू देणार नाही: गडचिरोली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कृतज्ञता मेळाव्यात छगन भुजबळ यांचा इशारा             १८ ऑक्टोबर कोरोना अपडेट: गडचिरोली जिल्ह्यात एकही बाधित वा कोरोनामुक्त नाही           

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

Thursday, 30th September 2021 11:58:53 PM

गडचिरोली,ता.१: शेतावर गेलेल्या इसमास बिबट्याने ठार केल्याची घटना आज सकाळी चामोर्शी तालुक्यातील इल्लूर येथे उघडकीस आली. शंकर गंगाराम चिताडे(५५) असे मृत इसमाचे नाव आहे.

शंकर चिताडे हे काल(ता.३०) आपल्या शेतावर गेले होते. परंतु रात्र होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबीय व गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान आज सकाळी शेतापासून काही अंतरावरील एका झुडुपात त्यांचा मृतदेह आढळून आले. बिबट्याने चिताडे यांच्या शरिराचे लचके तोडल्याचे आढळून आले. वनाधिकाऱ्यांनी घटनेची नोंद घेतली आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्य ठार होण्याची या पंधरवड्यातील ही दुसरी घटना आहे. १५ सप्टेंबरला जंगलात शेळ्या चारण्यास गेलेल्या एका बालकास बिबट्याने ठार केले होते. शिवाय अन्य दोन घटनांमध्ये एक बालक व महिला जखमी झाले होते.बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे परिसरातील नागरिक धास्तावले आहेत.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
8AMO4
  © 2014 - 2021 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना