/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२: विद्यापीठ लहान की मोठे, हे महत्वाचे नसून ते विद्यार्थी व समाजासाठी काय करते हे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.
येथील गोंडवाना विद्यापीठाच्या वर्धापनदिन आणि दशमानोत्सव सोहळ्याचे उद्घाटन श्री.सामंत यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते धानोरा मार्गावरील महाराजा सभागृहात हा कार्यक्रम झाला.
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.श्रीनिवास वरखेडी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मंचावर आ.डॉ.देवराव होळी, आ.कृ्ष्णा गजबे, प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, प्रभारी कुलसचिव डॉ.अनिल चिताडे, माजी कुलगुरु डॉ.विजय आईंचवार, डॉ.नामदेव कल्याणकर, डॉ.कीर्तिवर्धन दीक्षित यांच्यासह विविध विद्या शाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते.
शासन, प्रशासन आणि विद्यापीठाचे व्यवस्थापन यांच्यात समन्वय असल्यास कोणत्याही विद्यापीठाचा विकास शक्य आहे, असे उदय सामंत यावेळी म्हणाले. विद्यापीठ मोठे की लहान आहे, यापेक्षा ते विद्यार्थी आणि समाजासाठी काय करते हे महत्वाचे आहे, असे सांगून सांमत यांनी गोंडवाना विद्यापीठ हे लवकरच आदिवासी व वनविद्यापीठ म्हणून नावारुपास येईल, अशी आशा व्यक्त केली. शैक्षणिक विकासासाठी ५ वर्षांचा अॅक्शन प्लॅन तयार करण्याची सूचना सर्व विद्यापीठांना दिल्याचेही श्री.सामंत यांनी सांगितले.
याप्रसंगी तळोधी(बाळापूर) येथील शिक्षणमहर्षी डॉ.तु.वि.गेडाम यांना ‘जीवन साधना गौरव’पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच माजी कुलगुरु डॉ.विजय आईंचवार, डॉ.नामदेव कल्याणकर व डॉ.कीर्तिवर्धन दीक्षित यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. शिवाय विद्यापीठातील उत्कृ्ष्ठ अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले. प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.