सोमवार, 25 ऑक्टोबर 2021
लक्षवेधी :
  गरिबांचा प्रवास महागला:एसटीची १७.१७ टक्के भाडेवाढ, २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू             ओडिशातून भटकत आलेल्या रानटी हत्तींचा कोरची, धानोरा तालुक्यात धुमाकूळ, हत्तीच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी, पिकांचीही केली नासधूस             जहाल नक्षलवादी मंगरु मडावी यास पेरमिली परिसरातून अटक             ओबीसींच्या अर्धा टक्का आरक्षणालादेखील हात लावू देणार नाही: गडचिरोली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कृतज्ञता मेळाव्यात छगन भुजबळ यांचा इशारा             १८ ऑक्टोबर कोरोना अपडेट: गडचिरोली जिल्ह्यात एकही बाधित वा कोरोनामुक्त नाही           

महेंद्र ब्राम्हणवाडे गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे नवे अध्यक्ष

Thursday, 7th October 2021 08:13:02 AM

गडचिरोली,ता.७: युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ब्राम्हणवाडे यांच्या नियुक्तीने युवा वर्गात उत्साह संचारला आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ४ उपाध्यक्ष, १६ सरचिटणीस, १ प्रवक्ता, १७ सचिव,२ प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि ९ जिल्ह्यांच्या अध्यक्षांच्या नियुक्तीची यादी जाहीर केली. या यादीत महेंद्र ब्राम्हणवाडे यांची गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्याचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांची प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे हे ३५ वर्षे वयाचे असून, यापूर्वी त्यांनी ३ वर्षे एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष व युवक काँग्रेसचे ३ वर्षे लोकसभा अध्यक्षपद सांभाळले आहे. मागील ३ वर्षांपासून ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून महेंद्र ब्राम्हणवाडे यांची सर्वत्र ओळख आहे. ओबीसींचा युवा नेता म्हणून त्यांनी केलेले कार्य सर्वदूर परिचित झाले आहे. ओबीसी आरक्षणासाठी त्यांनी मोर्चे, मेळावे आदींच्या माध्यमातून सतत आवाज उठविला आहे. शिवाय यंदा कोरोना संसर्गाच्या काळात सतत ६० दिवस रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनदान, रक्तपुरवठा आणि रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचे मोठे कार्य केले आहे. एकूणच काँग्रेसला प्रथमच युवा, सतत कार्यरत आणि जनसंपर्क ठेवणारा जिल्हाध्यक्ष मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ.नामदेव किरसान यांनाही प्रदेश सरचिटणीस बनविण्यात आले असून, त्यांच्या जागेवर दिलीप बन्सोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
41A8N
  © 2014 - 2021 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना